पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक सुरु आहे. यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी रथ तयार करण्यात आला. आकर्षक फुलांची आरास केलेल्या रथावर बाप्पांची सुंदर मूर्ती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाली. यावेळी अनेक भाविकांना या रथाचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.